रत्नागिरी: महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे उद्या गुरुवार, १० सप्टेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते मंडणगड बस आगाराचे भूमिपूजन होणार असून ते दापोली येथे आयोजित आमसभेसही उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या अधिकृत दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
सकाळी १० वा. : मंडणगड बस आगार येथे आगमन आणि बस आगाराचे अधिकृत भूमिपूजन. (स्थळ: मंडणगड बस आगार, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी)
- सकाळी ११ ते सायंकाळी ५ वा. : दापोली येथील आमसभेला उपस्थिती व मार्गदर्शन. (स्थळ: राधाकृष्ण हॉल, ता. दापोली, जि. रत्नागिरी)
- सायंकाळी ०५.३० वा. : दापोली येथून खेड-चिपळूण-पाटण मार्गे मोटारीने कराडकडे प्रयाण.



