रत्नागिरी: मे महिन्याच्या सुट्टीची वाट कुणी कशासाठी पाहतात तर कुणी कशासाठी.. रत्नागिरी शहराच्या प्रभाग क्रमांक पाच मधली मुलं मात्र मे महिन्यात पूजा ताईंचा समर कॅम्प कधी लागतोय याकडे डोळे लावून बसलेली असतात.. तर.. बच्चे कंपनीची प्रतीक्षा आता संपलेली आहे.. सगळी मुलं ज्याची प्रचंड उत्सुकतेने, अधिरतेने वाट पाहतात, तो पूजा वहिनींचा खरंतर मुलांचा लाडका समर कॅम्प 5 मे पासून सुरू होतोय. यापूर्वी चार वर्षं पूजाताईनी प्रभागातल्या मुलांसाठी हा उपक्रम घेतला होता. यावेळी नगरसेविका झाल्यानंतर मात्र पूजाताई हा उपक्रम रत्नागिरी नगर परिषद, महिला बालकल्याण समिती यांच्या सहकार्याने घेणार आहेत. समर कॅम्प २०२६ मधील 5, 6, 7 आणि 8 मे हे मुलांचे फुल टू धम्माल करण्याचे आणि खेलकुद के दिन असणारेत..
सुट्टया पडल्या की मुलांना कुठे एंगेज करायचं हा प्रश्न पालकांसमोर असतोच! मुलांना कुठेतरी त्यातून काही चांगलं शिकली तर तेवढीच व्हॅल्यू अँडिशन! पाच ते आठ मे दरम्यान पाच ते चौदा वयोगटातल्या मुलांसाठी होणाऱ्या या समर कॅम्पमध्ये सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत मुलं बरंच काही करणारेत. नाचणार, गाणार, चित्र रंगवणार, खेळणार… कारण बाळासाहेब ठाकरे ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये होणाऱ्या या धम्माल कॅम्पमध्ये मुलांसाठी आहे, चित्रकला, डान्स, पपेट शो, म्युझिक, खेळ आणि क्राफ्ट!
या समर कॅम्प मध्ये मुलानी केवळ धम्माल करायची नाहीये तर त्यात भरपूर बक्षिसांची लयलूट देखील आहे. बेस्ट आजी आजोबा, बेस्ट ग्रुप, बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर, आणि बेस्ट आई बाबा अशी विविध बक्षीसं मिळणार आहेत.
याशिवाय श्लोक, प्रार्थना, बोधकथा, वारली पेंटिंग, एरोबिक्स, फनी गेम्स, पपेट शो, पक्ष्यांचे आवाज, वाळू शिल्प, प्रोजेक्ट मांडणी अशा भरपूर ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत आणि आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली, नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ. प्रीती सुर्वे, उपसभापती पूजा पवार यांनी सर्व सभापती आणि नगरसेवकांच्या सहकाऱ्याने मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केलेल्या या समर कॅम्पमध्ये मुलांना पाठवून पालकांनी त्यांना त्यांचं हक्काचं बालपण अनुभवण्याची संधी द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.



