रत्नागिरी: पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात ७ ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडलेल्या ‘महाराष्ट्र राज्य मास्टर स्विमिंग कॉम्पिटिशन’मध्ये रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’च्या खेळाडूंनी तब्बल ९ पदकांची लयलूट करत चमकदार कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सौ. गौरी महेश मिलके आणि विशाल कुबल यांची आगामी आशियाई अजिंक्यपद (आशिया चॅम्पियनशिप) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे ३ खेळाडू सहभागी झाले होते. तिघांनीही आपापल्या वयोगटात उत्कृष्ट जलतरणाचे प्रदर्शन करत रत्नागिरीचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले.
🏊♂️ खेळाडूंची पदकनिहाय कामगिरी:-
सौ. गौरी महेश मिलके (वयोगट: ४० ते ४५ वर्षे)
🥈 रौप्य पदक: ४०० मी. फ्रीस्टाईल
🥉 कांस्य पदक: २०० मी. फ्रीस्टाईल
🥉 कांस्य पदक: २०० मी. वैयक्तिक मेडले
विशाल कुबल :- (वयोगट: ३५ ते ३९ वर्षे)
🥈 रौप्य पदक: १०० मी. बटरफ्लाय
🥉 कांस्य पदक: २०० मी. वैयक्तिक मेडले
🥉 कांस्य पदक: ५० मी. बटरफ्लाय
अल्फराज कापडे :-
३० ते ३४ वर्षे वयोगट
🥈 कास्य पदक: १०० मी. फ्रीस्टाईल
🥈 कास्य पदक: ५० मी. बटरफ्लाय
🥈 कास्य पदक: २०० मी. फ्रीस्टाईल
आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी :-
या स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर सौ. गौरी मिलके आणि विशाल कुबल यांची ३ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बंगलोर (बंगळुरू) येथे होणाऱ्या ‘आशिया चॅम्पियनशिप’ (Asian Championship) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक महेश मिलके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या दैदिप्यमान यशाबद्दल आणि आंतरराष्ट्रीय निवडीबद्दल रत्नागिरीतील क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



