Friday, July 24, 2026

Latest Posts

कोकण परिक्षेत्रातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण रत्नागिरीत यशस्वी

रत्नागिरी : कोकण परिक्षेत्रातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित दोन दिवसीय “Capacity Building and Behavioural Leadership Initiative Training” रत्नागिरी येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे नेतृत्व, प्रशासकीय क्षमता आणि नागरिकाभिमुख पोलीसिंग अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली हे प्रशिक्षण २१ व २२ जुलै रोजी रत्नागिरी येथील विश्वेश्वरय्या हॉलमध्ये पार पडले.
या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांची नेतृत्व क्षमता विकसित करणे, प्रशासकीय कौशल्य अधिक सक्षम बनविणे, आधुनिक पोलीस व्यवस्थापनाच्या संकल्पना प्रभावीपणे राबविणे आणि नागरिकांशी संवेदनशील व विश्वासार्ह संवाद प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य प्रदान करणे हा होता.
दोन दिवसांच्या प्रशिक्षणात नेतृत्व कौशल्य, प्रशासकीय क्षमता, प्रभावी संवादकौशल्य, वर्तन कौशल्य तसेच नागरिकाभिमुख पोलीसिंग या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये पोलीस उपअधीक्षक भानुदास खटावकर, श्रीमती मोसमी निलाखे आणि श्रीमती ईशानी कांचन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत निर्णयक्षमता, प्रभावी नेतृत्व, बदलत्या काळातील पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका, संघभावना वृद्धिंगत करण्याच्या पद्धती, जबाबदारीची जाणीव आणि परिणामकारक निर्णयप्रक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
या प्रशिक्षणादरम्यान संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून सहभागी अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणारी व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. प्रशिक्षणात सहभागी अधिकाऱ्यांनीही अशा प्रकारचे प्रशिक्षण पोलीस दलातील नेतृत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.