Wednesday, July 15, 2026

Latest Posts

गोदुताई जांभेकर विद्यालयात ‘विधी सेवा जनजागृती’ कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी: येथील गोदुताई जांभेकर महाविद्यालय (विद्यालय) येथे ‘विधी सेवा जनजागृती’ कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत ‘बेटी बचाव बेटी पढाओ’, ‘महिलांची सुरक्षितता’, ‘मुलांसाठी पोक्सो कायदा २०१२’ आणि ‘रोड सेफ्टी’ (रस्ता सुरक्षा) या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले.
    या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरीचे सचिव आर. आर. पाटील आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), श्रीमती. एच. आर. जाधव उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध कायदेविषयक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. नॅशनल लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी (NALSA) अंतर्गत मिळणाऱ्या मुलांसाठीच्या बाल-अनुकूल कायदेशीर सेवा, मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण करणारा कायदा (पोक्सो, २०१२) आणि नालसा हेल्पलाईन क्रमांक १५१०० (15100) याविषयी त्यांनी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी, सर्व शिक्षक सहकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी स्वयंसेवक श्रीकांत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, कायदेविषयक या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा बहुसंख्येने लाभ घेतला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.