Tuesday, April 14, 2026

Latest Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमच पोलीस दलाकडून मध्यरात्रीच अभिवादन

रत्नागिरी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी पोलीस दलाने यंदा प्रथमच एक अनोखा उपक्रम केला. शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पोलीस दलाकडून प्रथमच मध्यरात्री अभिवादन करण्यात आले.
  आज डॉ. आंबेडकर यांची जयंती. या निमित्ताने त्यांचे रत्नागिरीतील हजारो अनुयायी रत्नागिरी शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील पुतळ्यासमोर जमत आहेत. अभिवादन करत आहेत. ज्या बाबासाहेबांनी जगायला शिकवले त्यांना पोलीस दलाने मध्यरात्रीच सलामी देत मानवंदना दिली. यावेळी पोलिस अधीक्षक नितिन बगाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील अन्य पोलिस अंमलदार उपस्थित होते.  तसेच या ठिकाणी भीम अनुयायी देखील उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.