Tuesday, July 21, 2026

Latest Posts

धामणसे येथील रत्नेश्वर ग्रंथालयातर्फेसायकलिंग एव्हरेस्टवीर अथर्वचा सन्मान

रत्नागिरी : गावातील विद्यार्थ्यांमध्ये चांगली ताकद असते. विद्यार्थ्यांसाठी सायकलच्या स्पर्धा असतात. या विद्यार्थ्यांना सायकलिंगमध्ये करिअर देखील करता येऊ शकते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आपल्यासोबत आहे. विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळावे याकरिता एकत्र सायकलिंग करूया, असे आवाहन माऊंट एव्हरेस्ट सायकलिंग किताब पटकावणाऱ्या अथर्व शेंड्ये याने केले.

गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याबद्दल सन्मानचिन्ह, वाचनीय पुस्तक,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्याचा सन्मान धामणसें येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयातर्फे अध्यक्ष उमेश कुळकर्णी आणि सरपंच अमर रहाटे यांच्या हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना तो बोलत होता. अथर्वने सायकल एव्हरेस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. टेंबेपूल ते चाळकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र हा चढाव त्याने ७० वेळा पार करत ४१ तासांत सलग ५०० किलोमीटरहून अधिक सायकलिंग आणि १०,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची चढाई पूर्ण केली.

या कार्यक्रमात ग्रंथालयातर्फे माध्यमिक विद्यालय धामणसें  क्रीडा साहित्याचे,नकाशे प्रत्येक विद्यार्थ्याला कंपास पेटी चे वाटप अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या हस्ते केले. या कार्यक्रमाला उपसरपंच सौ. ऋतुजा कुळकर्णी, रत्नागिरीच्या नगरसेविका सौ. मेधा कुळकर्णी, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार मकरंद पटवर्धन, श्री रत्नेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत देसाई, उपाध्यक्ष अविनाश जोशी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय निवेंडकर, सोसायटीचे सचिव सुनील लोगडे, दीपक जाधव, ग्रंथालयाचे चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, उपाध्यक्ष विलास पांचाळ, केशव कुळकर्णी, प्रशांत रहाटे, विश्वास धनावडे, अनंत जाधव, सौ. स्मिता कुळकर्णी, अविनाश लोगडे, अन्वी वारशे, ग्रामपंचायत सदस्या सौ. वैष्णवी धनावडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय गायकवाड , प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संपदा ढापरे , अंगणवाडी सेविका, बचत गट प्रतिनिधी आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक महेश धनावडे यांनी केले

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.