रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजता कोंकणकन्या एक्सप्रेसने (गाडी नं.२०१११) रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी कडे प्रयाण. सकाळी ६.१५ वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सकाळी ९ ते ११ वाजता भेटीसाठी राखीव. (स्थळ : पाली कार्यालय, पाली, ता.जि. रत्नागिरी). सकाळी ११.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी येथे भेट व मोटर ट्रेनिंग स्कूल च्या अडीअडचणींबाबत बैठक (स्थळ : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गणेशनगर, पोमेंडी खुर्द, कुवारबाव, रत्नागिरी) दुपारी १.०० वा. कुवारबांव झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक (स्थळ : कुवारबाव ग्रामपंचायत कार्यालय, कुवारवाब, रत्नागिरी) दुपारी २ वाजता जिल्हा कुस्ती असोसिएशन तर्फे कुस्ती मॅट वितरण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम, मारूती मंदिर, रत्नागिरी) दुपारी २.३० वा. रत्नागिरी नगर परिषद स्थापना दिन १५० वर्षे पूर्ण या निमित्ताने कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी असो. आयोजित क्रिडा स्पर्धा व स्नेहसंमेलन कार्यक्रमास भेट. (स्थळ : स्वा.वि.दा.सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी) दुपारी ३.०० ते ३.३० वाजता राखीव. सायं ४.३० वाजता शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : पित्रे हॉल. देवरूख, ता. संगमेश्वर). सायंकाळी ६.३० वाजता जिल्हा परिषद शाळा, मानसकोंड नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : जिल्हा परिषद शाळा, मानसकोड). रात्रौ ८.०० वा. कुलदेवता मंडळ परचुरी चंदरकरवाडी येथील श्री सत्यनारायण महापूजा कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : परचुरी चंदरकरवाडी, ता. संगमेश्वर). रात्रौ ९.३० वाजता वाटद-खंडाळा महोत्सव २०२६ येथे उपस्थिती. (स्थळ : वाटद, रत्नागिरी) रात्रौ ११ वाजता श्री नवलाई युवक मंडळ, जाकीमिऱ्या (अलावा) यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित श्री सत्यनारायण पूजा कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : श्री नवलाई युवक मंडळ, जाकीमिऱ्या अलावा) रात्रौ सोईनुसार रत्नागिरी येथे राखीव व मुक्काम.
रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता सौरमंडळ सोलर कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती (स्थळ : शंखेश्वर हेरिटेज सहकारी गृहनिर्माण संस्था, आरोग्यमंदिर, रत्नागिरी) सकाळी १०.३० वाजता ईराणी नवाबज् नूतन शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ : शॉप नं. १९, के.सी. जैन नगर, रत्नागिरी) सकाळी ११ वाजता ओंकार अॅग्रो एजन्सीज आयोजित “माझी शेती माझा अभिमान इंस्टाग्राम रील्स स्पर्धा २०२६” च्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : ओंकार अॅग्रोटेक, सुभाष रोड, रत्नागिरी) दुपारी १२ वाजता नाखरे गावातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : नाखरे, रत्नागिरी)



