Wednesday, July 15, 2026

Latest Posts

मुंबई-गोवा महामार्गावर धामणदेवीजवळ दरड; मुंबईकडे जाणारी लेन बंद

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत, कशेडी बोगद्यापुढे धामणदेवी गावाजवळ आज पहाटे मोठी दरड कोसळली. या घटनेमुळे खबरदारीचा उपाय म्हणून गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन तातडीने बंद करण्यात आली असून, उर्वरित मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच महाडचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. सध्या जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे प्रशासनाने वाहनचालकांना या महामार्गावरून अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.