Wednesday, July 22, 2026

Latest Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात “मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचे” भव्य आयोजन

रत्नागिरी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २२ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात “मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांचे” आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे २०० मोफत आरोग्य शिबिरे पार पडत आहेत. 
हे आरोग्य अभियान जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या समन्वयाने यशस्वीपणे राबवले जात आहे.
शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणांचा एकत्र सहभाग
या मोहिमेत धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष (रत्नागिरी), जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, एनसीडी (NCD) कार्यक्रमप्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक आणि जिल्ह्यातील संलग्नीत खाजगी रुग्णालये संयुक्तपणे मोफत आरोग्य सेवा पुरवत आहेत.
शिबिरांमध्ये उपलब्ध प्रमुख मोफत आरोग्य सेवा:
पूर्ण शरीर व रक्त चाचण्या: ईसीजी, बीएमआय  आणि महत्त्वाच्या रक्त चाचण्या.
गंभीर आजार व समुपदेशन: कर्करोग (Cancer), मधुमेह व लेप्टोस्पायरोसिस तपासणी आणि मार्गदर्शन.
स्त्री-बाल कल्याण: लहान मुलांच्या मोफत तपासण्या, गरोदर महिलांची तपासणी, समुपदेशन व मोफत लसीकरण.
विशेष शस्त्रक्रिया: सावर्डे येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाद्वारे लहान मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया तसेच मूळव्याध, भगंदर व फिशर यांसारख्या आजारांवर मोफत लेसर शस्त्रक्रिया शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन:
“जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांनी व नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन वैद्यकीय अधिकारी तथा अध्यक्ष डॉ. सुमित सावंत व समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे यांनी केले आहे. शिबिराच्या वेळापत्रकासाठी नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे संपर्क साधावा.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.