Wednesday, July 15, 2026

Latest Posts

लांजा हादरला! क्रेटा-डंपर भीषण अपघातात ४ ठार, १ गंभीर जखमी


मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे आज सकाळी भीषण अपघात झाला आहे.

लांजा रेस्ट हाऊसजवळ गोव्याहून मुंबईकडे जाणारी क्रेटा कार क्रमांक MH 01 CP 8021 ही महामार्गावर उभ्या असलेल्या डंपर क्रमांक MH 05 EL 3877 ला पाठीमागून जोरदार धडकली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.

या भीषण अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर उपचार सुरू आहेत.

ही दुर्घटना आज बुधवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.