रत्नागिरीतील जनतेसाठी मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग पवित्र दर्शनाचा सुवर्णयोग
बुधवार दिनांक १८ जून २०२५*
रुद्र पूजा आणि दर्शन सोहळा वेळ सायंकाळी ६ ते ८.३०
स्थळ : अंबर हॉल , टी आर पी ,रत्नागिरी
गुरुवार दिनाक १९ जून २०२५
दर्शन सोहळा वेळ – सायंकाळी ६.०० ते ८.३० वाजेपर्यंत*
स्थळ : मराठा मंडळ हॉल,जिल्हा परिषद जवळ, माळनाका,रत्नागिरी
अकराव्या शतकात मोहम्मद गजनी याने सोमनाथ मंदिरावर
चढाई करून पवित्र शिवलिंगाचे तुकडे केले. त्यावेळी त्याचे काही अवशेष अग्निहोत्री यांनी जपून ठेवून त्याला शिवलिंगाचा आकार देऊन पूजा केली. आणि हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवले.
1924 साली कांचीचे परमचार्य यांनी सांगितले की 100 वर्षांनी बंगलोर मध्ये स्थित संत येतील त्यांना ते नेऊन द्या.आणि हे शिवलिंग *गुरुदेव*श्री.श्री. रविशंकरजी यांच्याकडे बंगलोर आश्रम मध्ये सुपूर्त करण्यात आले.
या यात्रेद्वारे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे अवशेष जनतेसमोर आणले जातील जे भारताच्या संस्कृतीचा आणि आध्यात्मिक वारशाचा अमूल्य भाग आहेत.
या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे पवित्र अवशेषांचे सर्व समाजाला दर्शन मिळावे हा उद्देश ठेवून गुरुदेव त्यांचे अनुयायी भारतातील सर्व भागांमध्ये पाठवत आहेत.
*ही यात्रा तळकोकणातून सुरु होत असून आपले भाग्य की, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरात हे ज्योतिर्लिंग येत आहे. तरी आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.*
*असे आवाहन वेदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी तर्फे करण्यात येत आहे.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



