Wednesday, March 25, 2026

Latest Posts

राज्यस्तरीय ग्रामरत्न सरपंच पुरस्कार निवळीचे उपसरपंच संजय निवळकर यांना प्रदान

रत्नागिरी: लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद व जयंतराव पाटील मित्रमंडळ, कुर्डू यांच्या संयुक्तविद्यमाने ग्रामरत्न सरपंच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद द्वारा आयोजित ग्रामरत्न सरपंच पुरस्कार रत्नागिरी तालुक्यातील निवळीचे विद्यमान उपसरपंच संजय निवळकर यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,यशदाचे माजी महासंचालक तथा माजी विभागीय आयुक्त
चंद्रकांत दळवी,प्रसिद्ध इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे,अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील,उपाध्यक्ष शशिकांत मोरे,अ.भा.सरपंच परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे,अ.भा.सरपंच परिषद पुणे महिला जिल्हाप्रमुख उज्वला गोकुळे,अ.भा.सरपंच परिषद उत्तर पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब काळे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. सन्मानाला प्रत्युत्तर देताना उपसरपंच संजय निवळकर हे म्हणाले की खऱ्या अर्थाने हा सन्मान गांवच्या विकासात भरणार घालणारा आहे तसेच हा सन्मान माझा नसून आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा व ग्रामस्थांचा आहे खऱ्या अर्थाने गावचा सर्वांगीण विकास करणे हे एकच माझ्यासमोर उद्दिष्ट आहे आणि मिळालेल्या पुरस्कारामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळेल.आता ग्रामरत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांच्या कार्याची दखल राज्य पातळीवर घेतली जात आहे.   गावकरी, सामाजिक संस्थांपासून ते अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून प्रोत्साहन दिले जात आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.