Tuesday, March 31, 2026

Latest Posts

नारळी पौर्णिमानिमित्त शुक्रवारी स्थानिक सुट्टी

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त 3 सार्वजनिक सुट्टया जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी 8 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
   त्याबरोबरच ज्येष्ठा गौरी विसर्जन निमित्ताने 2 सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशी (अभ्यंगस्थान) निमित्ताने 20 ऑक्टोबर रोजी देखील स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दीकरिता जाहीर केले आहेत. याबाबता सन 2025 साठी स्थानिक सुट्टयांची अधिसूचना 7 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.