Thursday, March 26, 2026

Latest Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाची शहरातल्या समस्याबाबत रत्नागिरी नगरपालिकेत धडक

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार* पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव *श्री.बशीर  मूर्तुझा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शहरातल्या समस्याबाबत रत्नागिरी नगरपालिकेत धडक.     यावेळी शहरातील समस्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी अतिशय आक्रमक झाले होते त्यांनी रीतसर मुळात दोन समस्यांवरती प्रश्न उपस्थित केले.
*(१)* .शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर पुराव्यानिशी अतिशय दुरवस्थेत भयानक पडलेले खड्ड्यांबाबत नगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी *श्री.वैभव बागवे* यांनी खड्डे बुजवतो असे सांगितल्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक होऊन नुसतं बुजून चालणार नाही परत पाऊस पडून ते तसेच दुरावस्थेत येतील त्यामुळे *आर.एम.सी करावे* असे सुचवले. यावेळी मुख्याधिकारी यांनी आरएमसी करण्याचे आश्वासन दिले. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक जिल्हाध्यक्ष *श्री.नौसीन काझी* यांनी मुख्याधिकारी नगरपालिका यांना एक आव्हान करताना असे सांगितले *” मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही जागेवर गेल्याशिवाय समस्या समजत व ती सोडविता येत नाही ‘* असे ठणकावून सांगितल्याने, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी आपले नगरपालिकेचे प्रतिनिधी घटनास्थळी पाठवून दिले व दिलेला शब्द पाळला तसेच निरीक्षण करून शहरातील खड्डे *आर.एम.सी* ने बुजवण्याचे मुख्याधिकारी यांनी आदेश दिले.

*(२)* . त्यानंतर राष्ट्रवादी महिला पदाधिकारी  जिल्हा महिला उपाध्यक्ष *सौ.शमीम नाईक* , शहर कार्याध्यक्ष *सौ.मुनव्वर-सुलताना फरहान मुल्ला* , अल्पसंख्याक शहराध्यक्ष *सौ.फर्जना मस्तान*
*सौ.आलिया मजगावकर* यांनी पुरावे दाखवत शहरामध्ये *भटक्या कुत्र्यांपासून* शहरातील नागरिक व लहान मुलांवरती जीव घेणे हल्ले होत आहेत त्यासाठी या *भटक्या कुत्र्यांचं* लवकरात लवकर नियोजन करावे असे सांगितल्यावर मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून त्यांचे *निर्भीजीकरण* करणे व *सुप्रीम व हाय कोर्टाच्या* आदेशानुसार त्यांचे नियोजन करावे असे सांगितले.

          शहरातील समस्यांसाठी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष:शरदचंद्र पवार* पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत जाऊन नियोजनबद्ध  मांडलेल्या प्रश्नाबाबत शहरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ व मा.नगरसेवक *श्री.सईद पावसकर* , श्री *.फरहान मुल्ला,* विद्यार्थी जिल्हाध्यक्ष *श्री.संकेत कदम* , तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष *श्री.महबूब मोगल* , मा.नगरसेवक *श्री.बबन आंबेकर* , जिल्हा युवक सरचिटणीसतालुका  *श्री.मतीन बावानी* , *श्री.रणजीत शिर्के,* जिल्हा युवक उपाध्यक्ष *श्री. नदीम मुजावर* , युवकचे *फैज सावकार* , *जुबेर करंबेळकर* , *कय्युम काझी*  आदी पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.