Sunday, March 22, 2026

Latest Posts

चिपळूणच्या ३५ पुलांचा पुनर्जन्म 70 कोटींचा निधी मंजूर करुन, पूलांचे बांधकाम केले पुर्ण: शब्द नव्हे, वचनपूर्ती”– आमदार शेखर निकम

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी 2019 आपल्या कार्यकाळात विकासकामांना नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. त्यांच्या प्रयत्नातून  चिपळूण तालुक्यातील 35 धोकादायक व जीर्ण पुलांची पुनर्बांधणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असून, सुमारे ₹70 कोटींचा निधी राज्य शासन व नाबार्डच्या माध्यमातून मंजूर करून हे काम वेळेत पूर्ण करण्यात आले. मात्र, २३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता पिंपळी-नांदिवसे रस्त्यावर प्रजिमा २३ अंतर्गत येणारा पिंपळी पूल (मोठा पूल, कि.मी. 1/00) कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. हा पूल अनेक वर्षांपासून जुनाट अवस्थेत होता, *आमदार शेखर निकम यांनी २०२२ पासून याच्या पुनर्बांधणीसाठी रत्नगिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला व त्यांचे माध्यमातून निधी मंजूर झाला आहे. त्यांचे चिपळूण जनतेच्या वतीने आमदार शेखर निकम यांनी  आभार मानले आहेत.
या घटनेनंतर काही ठिकाणी कुजबुज निर्माण झाली असली, तरी वस्तुस्थिती हीच आहे की, तालुक्यातील ३५ धोकादायक पूल सुरक्षित करण्यात आमदार शेखर निकम यशस्वी ठरले आहेत, आणि उर्वरित कामांसाठीही ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.माझं राजकारण हे फक्त घोषणांचं नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारं आहे. ३५ पूलांची पुनर्बांधणी आम्ही पूर्ण केली, आणि उर्वरित कामंही वेळेत पूर्ण करू असं प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी या पार्श्वभूमीवर केलं.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.