Saturday, March 28, 2026

Latest Posts

लायन्स क्लब रत्नागिरीचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी:  शहरांमध्ये शिक्षण क्षेत्रात आदर्श आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी लायन्स क्लब  रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करते. हे पुरस्कार प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग तसेच महाविद्यालय विभागामध्ये देण्यात येतात. अंगणवाडी, बालवाडी, शास्त्र विभाग या विभागातही हे पुरस्कार देण्यात येतात. शिक्षण समिती अध्यक्ष एमजेएफ लायन शिल्पा पानवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये *प्राथमिक विभागात सौ सायली दीपक राजवाडे*, कै. ल. ग .पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर, रत्नागिरी. *माध्यमिक विभाग सौ अनया नैनीश अभ्यंकर*, शिर्के प्रशाला ,रत्नागिरी. *महाविद्यालयीन विभागात श्री केतन कुमार जगन्नाथ चौधरी*, फिशरीज इंजीनियरिंग अँड पॉलीटेक्निक कॉलेज यांना  एम जे एफ लायन हेरंब पटवर्धन पुरस्कृत कै ल .ग.पटवर्धन स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, आणि रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे आहे .
या पुरस्कारांव्यतिरिक्त लायन्स क्लब तर्फे अन्य शिक्षकांनाही पुरस्कार देण्यात येतात. त्यामध्ये कै. अविनाश मोरे स्मृतीप्रित्यर्थ लायन साक्षी धुरी पुरस्कृत *अंगणवाडी सेविका स्वाती श्रीकांत पोटफोडे*, शिंदेवाडी ,पावस यांची निवड करण्यात आली आहे. बालवाडी शिक्षक विभागामध्ये एम जे एफ लायन शिल्पा पानवलकर पुरस्कृत कै.राजश्री दत्तात्रय गडकरी स्मृतीप्रित्यर्थ *सौ. प्रज्ञा पराग सुर्वे.* कै. ल. ग .पटवर्धन बालवाडी विभाग यांना देण्यात येणार आहे. पैगंबर वासी हुसेन खान आदमखान फडनाईक स्मृती पुरस्काराकरिता *डॉ दबिर इकबाल पठाण*, मत्स्य विद्यालय यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार एमजेएफ लायन ॲड शबाना वस्ता यांनी पुरस्कृत केला आहे. शास्त्र विषय विभागामध्ये कै. सौ. अलका देव स्मृती प्रित्यर्थ *श्री इंद्रसिंग बिज्या वळवी,* फाटक हायस्कूल, रत्नागिरी यांची निवड झाली आहे. हा पुरस्कार एम जे एफ लायन डॉ शिवानी पानवलकर यांनी पुरस्कृत केला आहे.लवकरच लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.