रत्नागिरी: रत्नागिरी नजीकच्या कारवांचीवाडी पारसनगर येथे जन्मदात्या आईने मुलीच्या तोंडात बोळा कोंबून हत्या केल्याची घटना घडली. सदर ३६ वर्षीय विवाहिता चिपळूण अलोरे येथून माहेरी आली होती. ज्या मुलीचा तोंडात बोळा कोंबून खून केला, त्या मुलीचे वय अवघे आठ महिन्याचे होते. ग्रामीण पोलीस स्थानक रत्नागिरी येथे महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे, जनतेतून संताप व्यक्त होत आहे.



