Friday, March 27, 2026

Latest Posts

आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कीर्तनसेवा

रत्नागिरी : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त हभप प्रवीण मुळ्ये यांनी कीर्तनसेवा सादर केली. देवी शारदेचे पूजन करून त्यांनी शारदादेवीचे महात्म्य सांगितले. त्यांच्या कीर्तनाला बालदोस्तांनीही टाळ्या वाजवून व गजर करून साथ दिली.शाळेमध्ये शारदामातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. तिची पूजा प्रवीण मुळ्ये यांच्यासमवेत शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर, सदस्य दादा कदम, तसेच मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, सर्व शिक्षक, शिक्षक-पालक संघाचे प्रतिनिधी यांनीही पूजन केले. त्यानंतर मुख्याध्यापिका कदम यांनी शारदोत्सवातील विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.
शारदोत्सवानिमित्त सभागृहात सजावट, रंगावली यांनी सुशोभन करण्यात आले आहे. शारदामातेचे महात्म्य मुळ्ये बुवांनी अतिशय सुरेख पद्धतीने मुलांना समजावून सांगितले. मोबाईलचा वापर कमी करा, अभ्यास, व्यायाम करणे, मोठ्यांचा आदर कसा करावा वगैरे अनेक गोष्टी त्यांनी कीर्तनातून संवादन साधत सांगितल्या.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.