Friday, March 27, 2026

Latest Posts

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची मुंबईला बदली; मनुज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

रत्नागिरी: रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) यांची पदोन्नतीने मुंबई येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मनुज जिंदल हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मुंबई येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने (GAD) यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. शासनाने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची बदली केली असून, त्यांच्या जागी मनुज जिंदल यांची नियुक्ती ‘जिल्हाधिकारी, रत्नागिरी’ या पदावर वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आली आहे.
नूतन जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पदभार स्वीकारण्याचे निर्देश श्री. मनुज जिंदल यांना त्यांच्या सध्याच्या ‘सह व्यवस्थापकीय संचालक, म.रा.र.वि.मं., मुंबई’ या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, रत्नागिरीतील नवीन पदाचा कार्यभार श्री. एम. देवेंदर सिंह यांच्याकडून त्वरित स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आपल्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रत्नागिरी जिल्ह्यात विविध विकास कामे आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या बदलीमुळे रत्नागिरीच्या प्रशासनात आता नेतृत्वाचा बदल झाला आहे. नूतन जिल्हाधिकारी श्री. मनुज जिंदल यांच्याकडे आता जिल्ह्याच्या प्रशासनाची धुरा सोपवण्यात आली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.