रत्नागिरी: ”दरवर्षी नवरात्र आलं की आम्हां बायकांना वेध लागतात ते देवीच्या दर्शनाचे! मग काय, घरातल्या सवडीनुसार टू व्हीलर काढायची आणि जवळपासच्या देवी करायच्या. अर्थात, दरवर्षी हे जमायचंच असं नाही. पण यावर्षी पूजा वहिनींच्या योगाने उत्तम देवदर्शन घडलं, तेही नवीन मैत्रिणींसोबत!”
मी प्रभाग क्रमांक पाच मध्ये राहणारी गृहिणी. इतकी वर्षं मुलं, त्यांचं शिक्षण या गडबडीत इकडेतिकडे बघायलाच वेळ मिळाला नाही. दरवर्षी नवरात्र आलं की ह्यांच्या मागे लागून जमतील तशा देवींच्या ओटी भरून यायच्या. यावर्षी पहिल्यांदाच समजलं की गेली चार वर्षं पूजा पवार वहिनी प्रभागातल्या महिलांना देवी दर्शन घडवतात. यावर्षी मीसुद्धा गेले. सुरुवातीला कुणीच ओळखीचं नव्हतं पण लगेचच छान ओळखी झाल्या. नव्या मैत्रिणी मिळाल्या. आमची इतकी सुंदर बडदास्त राखली होती म्हणून सांगू.. एसी बस होती. सर्वांना उपवास असेल तर तसा किंवा दुसरा असा फराळ होता. प्रत्येकीला पाण्याच्या बाटल्या दिल्या. भगवती, आदिष्टी, नवलाई, महालक्ष्मी आणि महाकाली अशा पाच देवींचं उत्तम दर्शन घडवलं. सोबतच्या मैत्रिणी म्हणाल्या त्यांना पूजा वहिनींनी तुळजापूरला देखील नेलं होतं. माझं पहिलंच वर्ष होतं पण मला खूप मजा आली. वेगळ्याच सख्यांसोबत जायला छान वाटलं. त्यानंतर मी ठरवलं, पूजा वहिनींचा एकही कार्यक्रम चुकवायचा नाही. त्या महिलांसाठी वेगवेगळे खूप छान कार्यक्रम घेतात असं नव्या मैत्रिणी म्हणाल्यात. मी आता सगळ्या कार्यक्रमांना जाणार आहे. आणि हो, पूजा वहिनींना मत द्यायलासुद्धा!
*वृषाली हर्डीकर*
*गृहिणी*
*पर्व नवं; सुरुवात नवी.. पाच नंबर मध्ये पूजा वहिनीच हवी!*



