रत्नागिरी: आजकाल शहरात बरेच योगा क्लासेस, झुंबा क्लासेस झालेत खरे, पण ते काही सगळ्या बायकांना परवडतात असं नाही. शिवाय, घरकामांतून, नोकरीधंद्यातून वेळदेखील मिळायला हवा ना? आम्ही बायका तर असला तर नोकरीधंदा, नाही तर घरातली कामं, मुलांची शिक्षणं, बाजारहाट यात इतक्या थकतो की स्वतःसाठी वेळ द्यायला हवा हे आमच्या ध्यानातच येत नाही. पण पूजा वहिनींनी आमच्या मागे लागून, प्रसंगी आम्हांला ढकलून दिवसभरात थोडा वेळ तरी व्यायामाला द्यायला उद्युक्त केलं. आमच्यासाठी प्रभागात मोफत योगा क्लासेस, झुंबा क्लासेस ठेवले. खरं सांगते, योगा क्लासला गेल्यापासून फ्रेश तर वाटतंच पण मनही शांत झालं. झुंबा क्लासमध्ये तर आमच्यापैकी कित्येकींची डान्स करण्याची इच्छा पूर्ण झाली. पूजा वहिनींच्या फिटनेससाठीच्या आग्रहामुळे आम्हांला शारीरिक फायदा तर झालाच, पण मानसिक ताणतणावांतून मुक्तता झाली. आता आमच्यापैकी प्रत्येक जण म्हणते, पूजा वहिनी झिंदाबाद!
*संध्या राजपूत*
*प्रभागातील महिला*
*अबकी बार, पूजाताई पवार!*



