रत्नागिरी: शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या साळवी स्टॉप येथील कचरा डेपोला गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सहावी स्ट्रॉबेरी कचरा संकलन केंद्रात (डेपो) साठवलेल्या कचऱ्याला अचानक गुरुवारी दुपारी आग लागली. कचऱ्यामध्ये प्लास्टिक आणि सुक्या वस्तूंचे प्रमाण जास्त असल्याने आगीचा भडका उडाला. आगीची तीव्रता जास्त असल्याने दूरवरून आगीच्या ज्वाला दिसल्या होत्या. घटनेचे गांभीर्य ओळखून रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाचा जवानांनी पाण्याचा मारा करून ही या आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या घटनेची माहिती मी तास नगरसेवक सौरभ मलुष्टे , नगरसेवक पूजा दीपक पवार आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.



