Monday, March 23, 2026

Latest Posts

आगामी निवडणुकीत आंबेडकरी विचारांचे पक्ष एकत्र लढणार

रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीत तालुक्यामधील बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) या आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन पक्षांची संयुक्त बैठक आज (१५ जानेवारी) दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे झाली. या बैठकीमध्ये सखोल चर्चा होऊन जागा वाटप १७ रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

या बैठकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) ज्येष्ठ नेते एल. व्ही. पवार, वंचित बहुजन आघाडीकडून तालूका अध्यक्ष राजेंद्र कांबळे, बिपीन आयरे, रंजित जाधव, मुकुंद सावंत, विरश्री बेटकर, राजू जाधव, विनोद कांबळे, अजित जाधव तर बहुजन समाज पार्टीकडून रत्नागिरी जिल्हा प्रभारी अनिकेत पवार, महासचिव किशोर पवार, माजी विधानसभा अध्यक्ष रत्नागिरी राजू जाधव, शहर अध्यक्ष रूपेश कांबळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.