रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी शहरातील मच्छिमार्केट जवळी आजगावकर कंपाउंड येथे बेशूध्द स्थितीत सापडून आलेल्या वृध्देचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयातील मृत्यू झाला. सुलभा सुर्यकांत पडवळ (60,रा.आजगावर कंपाउंड मच्छिमार्केट जवळ,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्देचे नाव आहे. शनिवार 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास मच्छिमार्केटजवळी आजगावरक कंपाउंड येथे सुलभा पडवळ या बेशूध्द अवस्थेत पडलेल्या मिळून आल्या. तेथील महिलांनी त्यांना रिक्षेतून उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर तेथील अतिदक्षता विभागात उपचार सूरु असताना शुक्रवार 16 जानेवारी रोजी मध्यरात्री 1 वा. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुलभा सुर्यकांत पडवळ यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. त्यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाणे येथील ह्या संपर्क क्रमांक 02352- 222333 किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलीस चौकीत संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



