Monday, March 23, 2026

Latest Posts

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ल. ग. पटवर्धन शाळेच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट संगीत कवायत सादरीकरण

रत्नागिरी :  आज 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात शाळेमध्ये पार पडला. शिर्के प्रशाला व ल. ग. पटवर्धन प्राथमिक शाळा यांचा एकत्रितरित्या हा कार्यक्रम संपन्न झाला. ध्वजवंदनाबरोबरच आजच्या प्रजासत्ताक दिनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या निर्देशानुसार सादर झालेली संगीत कवायत. शाळेतील इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी  देशभक्तीपर गीतांच्या ठेक्यावर कवायत संचलन केले. उत्कृष्ट सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीपर वातावरण तयार झाले होते. त्यांना फुटक मॅडम व वेदरे सर या शाळेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे व उपस्थित मान्यवर, पालक, माजी विद्यार्थी यांनी या विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. विराज स्वप्निल सावंत या विद्यार्थ्याने दुबई येथे इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये सहभागी होऊन इंटरनॅशनल सेकंड रँक प्राप्त केला. तसेच मीरा मकरंद झगडे या विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भरतनाट्यम स्पर्धेत सहभागी होऊन विशेष यश संपादन केले. तसेच किंगडम् वर्ल्ड रेकॉर्ड इन भरतनाट्यम् यामध्ये तिचा सहभाग होता. देशभक्तीपर गीतगायन, असाक्षर मुक्त गाव शपथ, विद्यार्थ्यांचे वाढदिवस, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक इत्यादी विविध गोष्टींनी प्रजासत्ताक दिन उल्हासमय वातावरणात पार पडला.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.