Saturday, March 21, 2026

Latest Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २८ रोजी चिपळुणात प्रचार सभा

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ जानेवारी रोजी चिपळूण दौऱ्यावर  येत आहेत. शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर महायुतीची भव्य जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ही एकमेव जाहीर सभा असल्याने भाजपकडून सर्व ताकद पणाला लावली जात आहे. भाजप नेते प्रशांत यादव सभा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.

या दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी एक जाहीर सभा घेणार आहेत. त्यात चिपळूण येथील सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले आहे. गुहागर आणि देवरूख नगरपंचायतीवर सेना-भाजप भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. याशिवाय चिपळूण, खेड व अन्य ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच महायुतीच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये यश मिळवत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. भाजप नेते प्रशांत यादव या सभेच्या यशस्वीतेसाठी भाजप कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मेहनत घेत आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.