रत्नागिरी – माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह संपदा तळेकर यांनी गगनगिरी हॉल मांडवी येथे जाहीर प्रवेश केला. त्याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, शिवसेना तालुकाप्रमुख बंडया साळवी, महिला शहर प्रमुख स्मितल पावसकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर, संजय साळवी, नगरसेवक बंटी कीर, राजू कीर, नगरसेवक निवेदिता कळंबटे, नगरसेवक विजय खेडेकर, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, वैभव खेडेकर, राकेश नागवेकर, मुन्ना चवंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.



