Tuesday, July 21, 2026

Latest Posts

चिपळूणमध्ये २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा होणार; जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

रत्नागिरी (प्रतिनिधी): भारतीय सैन्याने १९९९ मध्ये कारगिल क्षेत्रात राबवलेल्या ‘ऑपरेशन विजय’मध्ये पाकिस्तानी सैन्यावर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाप्रीत्यर्थ दरवर्षी २६ जुलै रोजी देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या वर्षीचा कारगिल विजय दिवस रविवार, २६ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या विशेष कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील वीर नारी, वीरमाता आणि वीर पिता यांचा सैन्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व वीर नारी, वीरमाता, वीर पिता, माजी सैनिक आणि सैनिक विधवा यांनी चिपळूण येथील सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
थोडक्यात मह्त्त्वाचे:
दिवस व वेळ: २६ जुलै, सकाळी १०.३० वाजता
ठिकाण: सैनिकी मुलांचे वसतीगृह, चिपळूण
विशेष: वीर परिवार व माजी सैनिकांचा सन्मान सोहळा

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.