Tuesday, July 21, 2026

Latest Posts

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे ३१ जुलै पासून सहकार कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सहकारी बँकांचे सभासद, संस्थांच्या पदाधिकारी/सदस्यांसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे निवासी प्रशिक्षण कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे ३१ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत होणार असून, सहकार क्षेत्रातील नामांकित डॉ. विठ्ठलराव विखेपाटील प्रबंध संस्थान (पुणे) या प्रशिक्षण संस्थेद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात सहकारी संस्था अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. राज्याच्या पतरचनेत जिल्हा बँका व सहकारी संस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. सहकारी संस्थांमध्ये सहकारी कायदा, वित्तिय व्यवस्थापन, संचालक मंडळाची कार्यपद्धती, जबाबदारी आणि लेखापरीक्षण या सारख्या महत्त्वाच्या घटकांचा समावेश असतो. सहकारी संस्थांचे संचालकांना सध्याच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी याबाबत माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या इच्छूक सहकारी संस्था पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ता यांनी प्रशिक्षण प्रवेश अर्ज व अन्य माहितीसाठी त्या-त्या तालुक्यातील बँकेचे क्षेत्रीय कार्यालय अथवा प्रधान कार्यालयातील प्रशासन विभाग रत्नागिरी येथे संपर्क साधून २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.