रत्नागिरी:- शहरातील बाजारपेठ परिसरात असलेल्या प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली. या दिवशी मंदिरात पहाटेपासूनच भक्तांची गर्दी उसळली होती.
यावेळी पूजा करण्याचा मान श्री. जितेंद्र जोशी व सौ. राधिका जोशी दाम्पत्याला मिळाला. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. भजन-कीर्तनाच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले होते आणि “विठ्ठल विठ्ठल” च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
भक्तांनी मोठ्या उत्साहात दर्शन घेत, आषाढी एकादशीचा आनंद लुटला.



