Wednesday, August 19, 2026

Latest Posts

रत्नागिरीत राष्ट्र सेविका समितीतर्फे ‘स्वरतरंगिणी’ घोषवादन; कोकण प्रांतातील ९ जिल्ह्यांचा सहभाग


रत्नागिरी :  राष्ट्र सेविका समितिच्या ९० वर्षपूर्तीचे औचित्य साधून संपूर्ण कोकण प्रांतामधून घोषवादन विशेष “स्वरतरंगिणी” या कार्यक्रमाचे रविवारी १६ ऑगस्टला आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोकण प्रांतात समाविष्ट एकूण नऊ जिल्हे व एक महानगरातून साखळी पद्धतीने घोषवादन करण्यात आले. दक्षिण रत्नागिरी येथील पतितपावन मंदिर, रत्नागिरी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  संगीत शिक्षिका सौ. विनया विराज परब उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या  डॉ. सौ. रंजना केतकर यांचे उद्बोधन ऐकण्याची संधी उपस्थितांना लाभली.
यावेळी त्यांनी राष्ट्र सेविका समितिचा ९० वर्षांचा प्रवास उलगडून सांगितला. १०० वर्षाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक सेविका ही एक पारंबी आहे. प्रत्येक सेविकेने अभ्यासाने अनुभवाने आणि अनुसरणाने तिचा वृक्ष बनवायचा आहे. असे त्या म्हणाल्या.
  यावेळी राष्ट्र सेविका समितितर्फे कोकण प्रांत सह कार्यवाहिका सौ. उमा अनिल दांडेकर, तसेच जिल्हा कार्यवाहिका सौ.मीरा  मोहन भिडे उपस्थित होत्या.
राष्ट्र सर्वोपरि हा भाव समाजात रुजवण्यासाठी सक्षम मातृत्व महत्वाचे. तोच उद्देश घेऊन विकसित भारताच्या वाटचालीस पूरक मातृशक्ती जागृत व संघटीत करण्याचे काम राष्ट्र सेविका समिति गत नव्वद वर्षांपासून करत आहे. सेवा, संस्कार, ‘स्वत्व’जागरण या आधारे महिलांमध्ये कार्यरत अखिल भारतीयच नव्हे तर अन्य देशातही सक्षमतेने उभे असलेले हे सांस्कृतिक महिला संघटन आहे.  नव्वदावे वर्ष नियमित कामाचा भाग असणाऱ्या “घोष” या विषयाला समर्पित आहे. सांघिकता, समरसता आणि शिस्तपालन यांचा ताल-लयबद्ध मेळ हे घोषवादनाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत व राष्ट्रभक्तीच्या सुरावटींवर आधारित रचनांचे उत्साहपूर्ण वादन सेविकांसहित उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करते.
    ह्या कार्यक्रमाला १८५ उपस्थिती होती. भारताच्या वाटचालीस पूरक मातृशक्ती जागृत व संघटीत करण्याचे काम राष्ट्र सेविका समिति गत नव्वद वर्षांपासून करत आहे. सेवा, संस्कार, ‘स्वत्व’जागरण या आधारे महिलांमध्ये कार्यरत अखिल भारतीयच नव्हे तर अन्य देशातही सक्षमतेने उभे असलेले हे सांस्कृतिक महिला संघटन आहे.  नव्वदावे वर्ष नियमित कामाचा भाग असणाऱ्या “घोष” या विषयाला समर्पित आहे. सांघिकता, समरसता आणि शिस्तपालन यांचा ताल-लयबद्ध मेळ हे घोषवादनाचे वैशिष्ट्य आहे. भारतीय शास्त्रीय संगीत व राष्ट्रभक्तीच्या सुरावटींवर आधारित रचनांचे उत्साहपूर्ण वादन सेविकांसहित उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करते.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण “समिति संवाद- कोकण प्रांत” या प्रांताच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात आले. https://www.facebook.com/share/1BghJjMeWJ/ या लिंकवर भेट देऊन वाचकांना कार्यक्रम पाहता येईल.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.