Thursday, August 27, 2026

Latest Posts

कांचन डिजिटल”तर्फे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेत यंदा “देखावा – आरास” असे दोन स्वतंत्र विभाग

स्वतंत्र विभागात पारितोषिक देणारी जिल्ह्यातील पहिली स्पर्धा
गणेशभक्तांना बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरीतील सर्वात लोकप्रिय “कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धा” यंदाही मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आली आहे. यंदा स्पर्धेचे वर्ष 7 वे वर्ष आहे. प्रतिवर्षी स्पर्धेमध्ये काही नवीन करण्याचा पायंडा आतापर्यंत राहिला आहे. तर यंदाच्या स्पर्धेत “देखावा ( चालचित्र/स्थिरचित्र ) आणि आकर्षक आरास” असे दोन स्वतंत्र विभाग करून पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा दोन स्वतंत्र विभागात पारितोषिक देणारी जिल्ह्यातील ही पहिली स्पर्धा ठरणार आहे. अर्थात या विभागांची पारितोषिके स्वतंत्र देण्यात येणार असल्याची माहिती “कांचन डिजिटल”चे संचालक, प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.

गणेशभक्तांमध्ये यंदाही या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. गणेशभक्तांकडून स्पर्धेबाबत विचारणा होऊ लागली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तालुकास्तरीय भव्य “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. “कांचन डिजिटल”तर्फे आयोजित करण्यात येणारी ही “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” ही अत्यंत दर्जेदार, भव्यदिव्य अशी ख्याती प्राप्त आहे. गतवर्षीपर्यंत स्पर्धेत देखावे व आरास या दोन्हींचा एकत्रित समावेश होता. मात्र यामुळे दरवर्षी परीक्षकांना सुंदर, नविन्यापूर्ण, आकर्षक व कल्पक आरास केलेल्या गणेशभक्तांवर अन्याय होतोय, असे वाटत होते. त्यामुळे यावर तोडगा म्हणून यावर्षीपासून देखावा ( चालचित्र/स्थिरचित्र ) आणि आकर्षक आरास” अशी दोन स्वतंत्र पारितोषिकेच देण्यात येणार आहेत. अर्थातच दोन्ही विभागांत प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. तर देखावा विभागात प्रतिवर्षीप्रमाणे विशेष उल्लेखनीय, प्रोत्साहनपर आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यंदाही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्याचा निर्णय कांचन मालगुंडकर यांनी घेतला आहे. तेव्हा गणेशभक्तांनी जोरदार तयारीला लागण्याचे आवाहन मालगुंडकर यांनी केले आहे.

“कांचन डिजिटल”तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या “घरगुती गणपती सजावट स्पर्धे”चा पारितोषिक वितरण समारंभ दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत दर्जेदार, भव्यदिव्य असा करण्यात येणार आहे.

सुबक गणेशमूर्ती” पारितोषिकाची

यंदाही “सुबक गणेशमूर्ती” या पारितोषिकाचा समावेश स्पर्धेत असणार आहे. मात्र स्पर्धेत सहभागी घरगुती सजावट करण्यात आलेल्या ठिकाणच्याच गणेशमूर्तीला हे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच हे पारितोषिक ती गणेशमूर्ती साकारलेल्या गणेशमूर्तिकाराला देण्यात येणे

स्पर्धेची ची नियमावली :-
□ नावनोंदणीसाठी अंतिम तारीख – गुरुवार दि. 10 सप्टेंबर
□ प्रवेशिका पाठवताना “देखावा ( चालचित्र/स्थिरचित्र )” किंवा “आकर्षक आरास” यापैकी कोणत्या विभागात सहभागी होणार याचा उल्लेख करावा.
□ प्रवेशिकेसोबत व्हाट्सअप नंबरवर “देखावा किंवा आरास” यांचा संपूर्ण फोटो पाठवणे बंधनकारक. तसेच सजावट व देखावा कोणता आहे ते मेंशन करणे गरजेचे आहे.
□ प्रवेशिका पाठवताना आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता व व्हाट्सअप मोबाईल नंबर, तसेच संपर्कासाठी अन्य एक स्वतंत्र नंबर पाठवणे गरजेचे आहे.
□ परीक्षण मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर सकाळपासून सुरू.
□ गणपती आगमनाच्या दुसऱ्या अर्थात परीक्षणाच्या दिवशी सर्व स्पर्धकांची सजावट पूर्ण असणे गरजेचे आहे, याची कृपया नोंद घेणे.
□ गणेशमूर्ती, आरास, देखाव्यामध्ये सुबकता हवी.
□ पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक आशय, संदेश असल्यास उत्तम.
□ धर्माकॉल, प्लॅस्टिक, फ्लेक्स आदी पर्यवरणाला हानी पोहोचविणाऱ्या गोष्टींचा वापर टाळललेला असावा.
□ नावनोंदणीसाठी भ्रमणध्वनी – 9422576736
□ अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी -8999332757
□ स्पर्धेचे परीक्षण तज्ज्ञ परिक्षकांद्वारे करण्यात येईल.
□ परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
□ स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
□ बक्षीस वितरणाची तारीख लवकरच कळवण्यात येईल.

स्पर्धेच्या नियोजनासाठी कांचन डिजिटल घरगुती गणपती सजावट स्पर्धेची कार्यकारणी सज्ज झाली आहे. यामध्ये कांचन मालगुंडकर, मुकेश गुंदेजा, नरेंद्र पाटील, अभिजीत नांदगावकर, मुकुंद विलणकर,  विजय पाडावे, विजय बासुतकर, निलेश जगताप, ओमकार पाटणकर, बाळकृष्ण चव्हाण, शकील गव्हाणकर, तन्मय दाते, अजिंक्य सनगरे, मंथन मालगुंडकर, श्रावणी मालगुंडकर, दीपिका कुबल यांचा समावेश आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.