Tuesday, March 24, 2026

Latest Posts

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये श्री सत्यनारायण पुजा व वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेमध्ये दरवर्षी १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधुन श्री सत्यनारायण पुजा व बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांकरीता वार्षिक नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करणेत येते. सदर कार्यक्रमास बँकेचे संचालक व अधिकारी कर्मचारीवर्ग तसेच को. ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी व पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.

बँकेने यावर्षी कर्मचा-यांकरीता विविध स्पर्धा व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा, रस्सीखेच, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, फनी गेम्स यासारख्या स्पर्धांचे आयोजन केले होते. क्रिकेट स्पर्धेमध्ये संगमेश्वर तालुका संघ विजेता तर प्रधान कार्यालय रजागिरी संघ उपविजेता ठरला. रस्सीखेच मध्ये देखील लांजा तलुक्याला मागे टाकत संगमेश्वर तालुक्याने बाजी मरली आणि लांजा तालुक्याला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले, संगीत खुर्चीमध्ये महिलांमध्ये श्रीम. मनिषा केळकर तर पुरुषांमध्ये श्री. संदीप तांबेकर यांनी विजेतेपद पटकावले, रांगोळी स्पर्धेत श्रीम. अनुजा पुनसकर विजेत्या तर श्री. सतिष सावंत उपविजेते ठरले. कॅरम स्पर्धेत महिला जेतेपद श्रीम. अनुजा पुनसकर यांनी पटकावले तर श्रीम, श्रेया खडपे या उपविजेत्या ठरल्या, कॅरम स्पर्धा पुरुषांमध्ये श्री.फरिद जुवळे विजेते तर श्री. सतिष सावंत उपविजेते ठरले. तसेच बुद्धीबळ स्पर्धेत श्री. सुनिल वैद्य हे विजयी झाले तर श्री. प्रदिप परीट हे उपविजेते ठरले.

बँकेने आयोजित केलेल्या सांस्कृतिक क्राक्रमामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बैंक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेवुन खेहसंमेलनाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यामध्ये महाराष्ट्र गीत. फिल्मी गीत, रेकॉर्ड डान्स यांचे उत्तम सादरीकरणे तर संगमेश्वर तालुक्याने तसेच त्यांचे सोबत अन्य तालुक्यांतील काही कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पारंपारिक नमनाने उपस्थितांची मने जिंकली. या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाच्या आयोजनामुळे बँकेतील कर्मचा-यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जिल्हाभरातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभाग घेतला.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२३-२४ करीता आपल्या सभासदांना ३०% लाभांश देवून ऐतिहासीक विक्रम केला तसेच बँकेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात रु.५००० कोटींचा व्यवसायाचा

टप्पा पार करून रु.९५.०० कोटी इतका ऐतिहासिक नफा मिळविला. बँकेच्या सर्व कर्मचा-यांच्या मेहनतीमुळेच बँकेची प्रगती होत असते याची दखल घेऊन, याचेच पारितोषिक म्हणून बँकेचे अध्यक्ष आदरणीय डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी तसेच सर्व संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांसाठी यावर्षीचे वार्षिक नेह संमेलन मोठ्या स्वरूपात करण्यासाठी मान्यता दिली. यामध्ये कर्मचारी वर्गाचे कॅप्टन म्हणजेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच बहुमुल्य मार्गदर्शनामुळे व पुढाकारामुळे वार्षिक खेह संमेलन कार्यक्रम दिमखात आणि उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रमावेळी बँकेचे संचालक श्री. मधुकर टिळेकर, डॉ. अनिल जोशी, श्री. महेश खामकर तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चव्हाण सरव्यवस्थापक डॉ. सुधिर गिम्हवणेकर, श्री. श्रीकृष्ण खेडेकर

तसेच सदर कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित असलेले को.ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष श्री. सुनिल साळवी को.ऑप. बँक एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस श्री. नरेंद्र सावंत व युनियनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारीवर्ग व पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे समारोप भाषणावेळी श्री. सुनिल साळवी व श्री. नरेंद्र सावंत यांनी बँकेच्या या स्तुत्य कार्यक्रमाचे कौतुक केले व अशा पद्धतीचा कार्यक्रम कोणत्याही इतर सहकारी बँकेत केला जात नसल्याचे सांगीतले व बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले तसेच कर्मचा-यांनी देखील बँकेच्या प्रगतीमध्ये प्रामाणिकपणे काम करुन बँकेची प्रगती साधावी असे आवाहन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजय चव्हाण यांनी देखील समारोप कार्यक्रमावेळी बँकेचे संचालक मंडळाने कर्मचारी वर्गाकरीता वार्षिक लेह संमेलन कार्यक्रम आयोजित करून सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास मान्यता दिली त्याबद्दल बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळाचे आवर्जुन आभार मानले. तसेच कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना कर्मचा-यांनी बँकेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे व झोकून देवून काम करून बँकेचे हित जोपासावे आणि आपल्या बँकेला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नंबर एक ला घेवुन जाणेसाठी कटीबद्ध रहावे असे आवाहन केले. बँकेने आयोजित केलेला वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. शेवटी बँकेचे उपसरव्यवस्थापक श्री. संदीप तांबेकर यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिशय सुंदर व बहारदारपणे श्री. जितेंद्र साळवी व श्रीम. त्रिवेणी माळवदे यांनी केले.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.