Monday, March 23, 2026

Latest Posts

मध्यवर्ती बस स्थानकाचा ११ मे रोजी लोकार्पण सोहळा

रत्नागिरी : गेली अनेक वर्ष रखडलेल्या रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे (ग्रामीण व शहरी) काम पूर्णत्वास गेले असून, भव्यदिव्य स्वरूपात साकारलेल्या या वास्तूचा लोकार्पण सोहळा ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता परिवहन मंत्री तथा म.रा.मा.प. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उ‌द्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश  बोरसे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य औ‌द्योगिक विकास महामंडळ यांच्यात झालेल्या समंजस करारानुसार रत्नागिरी जिल्हातील रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ काँक्रीटीकरण करण्याचे  काम महाराष्ट्र राज्य औ‌द्योगिक विकास महामंडळ रत्नागिरी यांच्याकडून हाती घेण्यात आले होते. रा.प. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक नुतनीकरण व वाहनतळ काँक्रिटीकरणाच्या कामासाठी अंदाजे १७.५० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या कामाला फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली. या कामामध्ये भव्यदिव्य प्रशस्त असे ग्रामीण व शहरी एकत्रित बसस्थानक बांधण्यात आले असून, त्यामध्ये प्रशस्त बसस्थानक इमारत, ग्रामीण बसेस करीता १४ फलाट व शहरी बसेस करीता ६ फलाटांची व्यवस्था उपलब्ध केलेली आहे, रा.प.चालक व वाहक (महिला व पुरुष) यांच्यासाठी सर्व सोयींयुक्त वातानुकूलित विश्रांतीगृह, सर्व सोर्थीयुक्त वातानुकूलित हिरकणी कक्ष, स्थानक प्रमुख कार्यालय, रा.प.चे इतर कार्यालये, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र पोलीस नियंत्रण कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष, विद्यार्थी पास व आरक्षण कक्ष, पार्सल कक्ष, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र प्रशस्त उपहारगृह, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह प्रशस्त प्रवाशी प्रतिक्षालय, ग्रामीण व शहरी प्रवाशांकरिता स्वतंत्र महिला व पुरुष प्रवाशी प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तसेच ग्रामीणसाठी ६ वाणिज्य अस्थापना गाळे व शहरीसाठी १८ वाणिज्य गाळे उपलब्ध करून दिले आहे. संपूर्ण बसस्थानक वाहनतळास काँक्रीटीकरण व ड्रेनेज व्यवस्था करण्यात आली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.