Tuesday, March 24, 2026

Latest Posts

भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे लोकार्पण रविवार १ जून रोजी

रत्नागिरी : गरोदर महिलांपासून अगदी शंभर वर्षाच्या वृध्दांपर्यंत सर्वप्रकारच्या आजारांवर मोफत उपचार व औषधांसह सेवाभावी तत्वावर चालवले जाणारे रत्नागिरीतील पहिले आणि महाराष्ट्रातील तिसरे रुग्णालय रत्नागिरीत सुरु होत आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे लोकार्पण रविवार १ जून रोजी सकाळी १०.३० वा.होत असल्याची माहिती जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिली. रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत  दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष केदार चव्हाण व सचिव ॲड. महेंद्र मांडवकर उपस्थित होते.
हे रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित पॅरामेडीकल स्टाफसह सुसज्ज करण्यात आले आहे. जनरल सर्जरी, हृदयरोग विभाग, कॅन्सर विभाग, लॅब, डायग्नोसिस्ट सुविधा, बालरोग विभाग, युरोलॉजी विभाग, स्त्रीरोग विभाग, नेत्ररोग विभाग, एमडी मेडिसिन, ऑर्थोपेडिक विभाग, न्यूरो विभाग अशा सुविधा असणार आहेत. हॉस्पीटलच्या आवारातच मेडिकलच्या सर्व औषधे मोफत मिळणार असल्याचे निलेश सांबरे यांनी सांगितले. याठिकाणी तीन ऑपरेशन थिएटर असून सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होणार आहे.
सामाजिक जबाबदारीतून आपण कमावलेल्या पैशातून हे प्रकल्प चालवत आहोत. कुणीही व्यक्ती पैशा अभावी वैद्यकीय उपचारांपासून वंचित राहता कामा नये हा यातील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुळ गावी पालघर येथील विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथे २०१४ मध्ये पहिल रुग्णालय उभारले. त्यानंतर शहापूर येथे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल सुरु करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यातील गोरगरीब सर्वांनाच या रुग्णालयात मोफत उपचार मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
रविवार १ जून रोजी सकाळी १०.३० वा. नाचणे रोड आयटीआय जवळ भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असल्याचे निलेश सांबरे यांनी सांगितले. या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार किरण सामंत हे उपस्थित राहणार आहेत.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.