Wednesday, March 25, 2026

Latest Posts

जिजाऊ संस्थेचे काम थक्क करणारे आहे : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

रत्नागिरी: जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निलेशजी सांबरे यांनी कोकणासह महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जेव्हा जेव्हा जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेशनी सांबरे करत असलेल्या कामाची माहिती मिळते तेव्हा तेव्हा थक्क व्हायला होते, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

रत्नागिरीतील जिजाऊ संस्थेच्या श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याला ना. राणे उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्यासह भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या रुग्णालयाला शुभेच्छा देताना ना. राणे यांनी जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, समाजातल्या प्रत्येक वर्गापर्यंत या संस्थेचे काम पोहोचले आहे. दिवसाचे 24 तास वर्षाचे 365 दिवस निलेशजी सांबरे काम करतात. गोरगरिबांच्या आयुष्यात परिवर्तन निर्माण करण्याचे काम ते करत असून रत्नागिरीत उभे राहिलेले श्री भगवान सांबरे मोफत रुग्णालय हा त्याचाच भाग आहे. निलेश सांबरे यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा तर आहेतच पण या कामात कुठे अडथळे आले तर आम्ही सोबत आहोत ही ग्वाही यावेळी ना. नितेश राणे यांनी दिली. तर हे काम करताना निलेशजी सांबरे यांना  वटवृक्षाखाली यायचे असेल तर भारतीय जनता पक्षात तुम्हाला योग्य तो मान सन्मान मिळेल अशी ग्वाही सुद्धा ना. नितेश राणे यांनी दिली.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.