Tuesday, March 24, 2026

Latest Posts

मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रत्नागिरी मनसेच्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष व राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी, रत्नागिरी येथे रत्नागिरी मनसेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरास महाराष्ट्र सैनिक , पदाधिकारी आणि रक्तदात्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला..हा सामाजिक उपक्रम यशस्वी केल्याबद्दल मनसे तालुका अध्यक्ष श रुपेश जाधव यांनी सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक आणि सहभागी रक्तदाते तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. याप्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष श रुपेश जाधव, शहर संघटक अमोल श्रीनाथ, तालुका उपाध्यक्ष  सौरभ पाटील, राजू पाचकुडे, विशाल चव्हाण, महिला सेना तालुका अध्यक्ष सौ अश्विनी चव्हाण, श्री सचिन सांडीम, सोम पिलणकर , महेश घाणेकर, राजू नंदाने, अक्षय सुतार , निखिल आंब्रे आदी पदाधिकाऱ्यांसह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.