खेड – कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल अनुसया जवळ कशेडी घाटात नव्या महामार्गावर मोठी दरड कोसळली आहे
पहाटे चारच्या सुमारास ही दरड कोसळली आहे
घटनेनंतर पोलीस, महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व रस्ता साफसफाईचे काम सुरू केले आहे.
महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी बंद आहे घटनास्थळी जेसीबीच्या साह्याने दरड माती बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे
सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.



