रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या उद्यान विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले काशीनाथ गोताड (रा. फगर वठार) यांचे सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे व रत्नागिरी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली सर्पदंशाने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली आणि मा. नामदार उदयजी सामंत यांच्या तर्फे ₹५ लाखांची तातडीची मदत देखील करण्यात आली.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाजवळ माडाच्या झापांची साफसफाई करत असताना त्यांना सर्पदंश झाला होता.
त्यानंतर त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
या दुःखद घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी तात्काळ मा. नामदार उदयजी सामंत यांना दिली.
या दुःखद घटनेची दखल घेत मा. नामदार उदयजी सामंत यांनी तातडीने संबंधित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे व रत्नागिरी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी यांनी दिवंगत काशीनाथ गोताड यांच्या पत्नींना धीर देत या कठीण प्रसंगी शिवसेना आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे सांगितल.
भविष्यामध्ये मुलांसाठी व कुटुंबासाठी कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास माननीय नामदार उदयजी सामंत हे शंभर टक्के गोताड कुटुंबीयांच्या पाठीमागे समर्थपणे उभे आहेत अशी खात्री सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक निमेश नायर, संतोष (बंटी) दत्तात्रय कीर, अभी दुडे, नगरसेविका स्मितल पावसकर, प्रिती सुर्वे, मेधा कुलकर्णी, सायली पाटील, रुक्सार खान,आदी उपस्थित होते.
दिवंगत काशीनाथ गोताड यांच्या कुटुंबीयांना धीर देत त्यांच्या पाठीशी कायम उभे राहण्याचा विश्वास यावेळी सर्व उपस्थितांनी व्यक्त् केला.



