रत्नागिरी, दि. २३ ऑगस्ट २०२६ – रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जावकर प्लाझा, जयस्तंभ येथे *ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर* यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पालकमंत्री *नामदार उदयजी सामंत साहेब यांना तातडीच्या कामानिमित्त चाकण येथे जावे लागल्याने* ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.
त्यांच्या अनुपस्थितीत हा उद्घाटन सोहळा *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. निलेश भगवान सांबरे साहेब* तसेच *पंचायत समिती सदस्य श्री. नेताजी पाटील* यांच्या शुभहस्ते *सकाळी ठीक ११ वाजता* संपन्न झाला.
*यावेळी उपस्थित मान्यवर -*
या प्रसंगी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सचिव *श्री. केदार चव्हाण*, रत्नागिरी तालुका अध्यक्ष *श्री. मंदार नैकर*, लांजा तालुका अध्यक्ष *श्री. योगेश पांचाळ*, *श्री. सचिन गोताड, श्री. साहिल गोरे, श्री. दीपक सांबरे, श्री. बंटी महाकाळ, श्री. कैलास आडवीरकर, श्री. राज फुटक, श्री. मंदार मांडवकर*, शिवसेना उपतालुकाप्रमुख *श्री. विलास उर्फ बंधू वारीशे*, पाऊस जिल्हा परिषद गट उपविभाग प्रमुख *श्री. प्रवीण शिंदे*, पंचायत समिती सदस्य *श्री. नामदेवजी कोकरे*, पावस विभाग समन्वयक *श्री. अजय तेंडुलकर, श्री. निलेश गजने* यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शुभचिंतक मोठ्या संख्येने हजर होते.
उपस्थित सर्व मान्यवरांनी ॲड. महेंद्र मांडवकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच *”या कार्यालयात जनतेच्या प्रश्नांसाठी ॲड. महेंद्र मांडवकर यांच्यासोबत आम्ही देखील खांद्याला खांदा लावून काम करू”* असे आश्वासन यावेळी मान्यवरांनी दिले.
*मोफत सेवा -*
या जनसंपर्क कार्यालयातून नागरिकांना शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, जाती, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर दाखल्यांसाठी अर्ज करणे, अर्जांचा पाठपुरावा करणे आणि जिजाऊ संस्थेच्या शैक्षणिक व आरोग्य उपक्रमांचे मार्गदर्शन या *सर्व सेवा पूर्णपणे मोफत* दिल्या जाणार आहेत.
खेड्यापाड्यातून येणाऱ्या सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात होणारा त्रास कमी व्हावा, हाच या कार्यालयामागील मुख्य उद्देश असल्याचे ॲड. महेंद्र मांडवकर यांनी यावेळी सांगितले.
*पत्ता :* जावकर प्लाझा, जयस्तंभ, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला, E-Wing, पहिला मजला, गाळा नं. १ व २, रत्नागिरी | *संपर्क : ९४२३२९२५७५*



