Tuesday, April 28, 2026

Latest Posts

रत्नागिरीच्या ४ वर्षांच्या इझान कापडेची विजयदुर्ग समुद्रात ऐतिहासिक कामगिरी; ठरला सर्वात लहान सागरी जलतरणपटू

विजयदुर्ग: येथील श्री दुर्गामाता कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि जिम स्विम अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत एका ४ वर्षांच्या चिमुकल्याने सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’चा अवघ्या ४ वर्षांचा खेळाडू इझान कापडे याने ५०० मीटर सागरी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करून या स्पर्धेतील ‘सर्वात लहान खेळाडू’ होण्याचा बहुमान पटकावला.
समुद्राच्या लाटा आणि पाण्याचा अंदाज घेणे मोठ्यांनाही कठीण जात असताना, इझानने दाखवलेली जिद्द आणि धाडस पाहून उपस्थित प्रेक्षक आणि आयोजकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
महेश मिलके स्विमिंग ग्रुपची मोठी झेप
राष्ट्रीय प्रशिक्षक महेश मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली इझानने हे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या स्पर्धेत रत्नागिरीच्या या ग्रुपमधील एकूण १८ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मात्र, इझानच्या या कामगिरीने संपूर्ण स्पर्धेचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या ४ वर्षांच्या वयात समुद्राचे ५०० मीटर अंतर पार करणे ही एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद बाब मानली जात आहे.
सर्व स्तरांतून कौतुक
इझानने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे आणि प्रशिक्षक महेश मिलके यांचे विशेष कौतुक होत आहे. “इतक्या लहान वयात मुलांमध्ये खेळाबद्दलची गोडी आणि समुद्राची भीती नसणे, हे त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतीक आहे,” अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या. या ऐतिहासिक कामगिरीमुळे इझान कापडे सध्या जलतरण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.