Friday, August 21, 2026

Latest Posts

रत्नागिरीत ‘Ratnagiri Photographer Cricket League’चा दिमाखदार थरार; पिक्सल पँथर विजेता

रत्नागिरी : जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीतील फोटोग्राफर्सना क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र आणण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘Ratnagiri Photographer Cricket League 2026 – Season 1’ या अनोख्या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप झाला. पिक्सल पँथर संघाने विजेतेपद पटकावत स्पर्धेच्या पहिल्या पर्वावर आपले नाव कोरले, तर फोकस वॉरियर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

जिल्ह्यातील तब्बल 100 फोटोग्राफर खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत एकूण 8 संघांनी लीग पद्धतीने सामने खेळले. शिवरुद्र टर्फ येथे झालेल्या या स्पर्धेमुळे फोटोग्राफी आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन मलकापूर येथील छायाचित्रकार व नगरसेवक अभिजित गुरव, ज्येष्ठ छायाचित्रकार अजय बाष्टे, चारुदत्त नाखरे, कलीम मुल्ला आणि विनय बुटाला यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच – निलय बने, मॅन ऑफ द सिरीज – स्वप्नील घडशी, उत्कृष्ट फलंदाज – स्वप्नील घडशी, उत्कृष्ट गोलंदाज – ओंकार मुचंडी, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – साई आंबुलकर यांनी पुरस्कार पटकावले. पंच व गुणलेखक म्हणून दर्शना पवार, रमिज सोलकर आणि मेघेश मोंडकर यांनी जबाबदारी सांभाळली.

स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सामन्यांचे सुनील बेंडखळे आणि सचिन काळे यांनी संगमेश्वरी बोलीभाषेतील उत्स्फूर्त आणि मनोरंजक समालोचन केले. त्यामुळे मैदानावरील क्रिकेटचा थरार आणखी रंगतदार झाला.

या स्पर्धेला मा. नामदार डॉ. उदयजी सामंत आणि मा. आमदार किरणजी सामंत यांचे विशेष प्रोत्साहन व सहकार्य लाभले. तसेच सर्व संघातील खेळाडूंना जिगर यांच्या माध्यमातून श्री. बाळाशेठ सुर्वे यांनी टी-शर्ट प्रायोजित केले.

स्पर्धेसाठी अमेय ज्वेलर्सचे मालक अमेय वीरकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे, युवासेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) तुषार साळवी, नगरसेविका पूजा ताई पवार, सन आर्ट फोटो – सांगली, ओंकार रहाटे – जयेश मंगल कार्यालय यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

तसेच युवा नेत्या अपूर्वताई सामंत आणि युवासेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) तुषार साळवी यांनी उपस्थित राहून खेळाडूंचे आणि आयोजकांचे अभिनंदन केले

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले, अमित आंबवकर, राजेश नंदानी, निलय बने, अमेय बने, अनिकेत दुर्गवली, अनुपम तिवारी, अनिकेत जाधव, शुभम बने, साई आंबुलकर, निलेश कोळंबेकर, विरेंद्र डाफळे, निखिल पाडावे, मयूर दळी, शुभेष मोरे आणि सिद्धांत शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.

फोटोग्राफीच्या क्षेत्रातील विविध वयोगटांतील छायाचित्रकारांना एकत्र आणत त्यांच्यातील मैत्री, संघभावना आणि एकजूट वाढवणारा हा उपक्रम ठरला. उत्तम नियोजन, उत्स्फूर्त सहभाग आणि मैदानावरील रोमांचक सामन्यांमुळे Ratnagiri Photographer Cricket League Season 1 ही स्पर्धा सर्व सहभागींसाठी संस्मरणीय ठरली.

दरम्यान, स्पर्धेच्या समारोपावेळी Season 2 ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पुढील पर्वाबाबत फोटोग्राफर्समध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.