Friday, August 21, 2026

Latest Posts

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ वे देहदान; माजी सैनिक कै. अनंत गोखले यांच्या पार्थिवाचे वैद्यकीय संशोधनासाठी दान

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास व संशोधनासाठी २२ वे मरणोत्तर देहदान नुकतेच संपन्न झाले. मूळचे लिमये वाडी (कर्ला, रत्नागिरी) येथील रहिवासी व भारतीय संरक्षण दलातील माजी सैनिक कै. अनंत नरहर गोखले (वय ७८) यांचे गुरुवारी, २० ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हे मरणोत्तर देहदान करण्यात आले.
संरक्षण दलात देशसेवा बजावलेल्या कै. अनंत गोखले यांच्या पार्थिवाचा उपयोग भावी डॉक्टरांच्या अभ्यासासाठी व वैद्यकीय संशोधनासाठी व्हावा, या उदात्त हेतूने कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. २० ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पार्थिव सुपूर्द करण्यात आले. या वेळी कै. गोखले यांची कन्या रूपाली लिमये, जावई मंदार लिमये, तसेच राजीव लिमये, मिताली भिडे, दिनेश आगाशे, शिरीष सोहोनी व मित्रपरिवार उपस्थित होता. या संपूर्ण प्रक्रियेसाठी समीर करमरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिष्ठाता डॉ. रामा भोसले, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव तसेच पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, प्रियल आडीवरेकर, मिथिलेश मुरकर, मिहीर लोंढे, राज पेडणेकर, श्रेयश जोशी, श्रीपाद गांधी आणि वाहन चालक प्रणय पाटील यांनी ही देहदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. समाजोपयोगी निर्णयाबद्दल अधिष्ठाता व महाविद्यालय प्रशासनाने गोखले कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.