Saturday, March 21, 2026

Latest Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लांजा तालुक्यात गावा– गावात स्वच्छता अभियान

आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम गावातील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी, कर्मचारी,महिला वर्ग, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी होणार सहभागी
७ जानेवारी ला लांजा तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणे होणार स्वच्छ  तालुक्यातील प्रत्यके गावात उद्या एकाच वेळी होणार स्वच्छता अभियान

लांजा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लांजा तालुक्यात गावा–गावात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पंचायत समिती लांजा आणि शिवसेना लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर तसेच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात येणार आहेत. नागरिकांचा स्वच्छतेबाबत सहभाग वाढावा आणि स्वच्छ, सुंदर गावाची संकल्पना प्रत्यक्षात यावी, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्याच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, राजकीय वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सामाजिक उपक्रमातून तो साजरा करण्याचा आदर्श यानिमित्ताने घालून देण्यात आला आहे. या स्वच्छता अभियानात शिवसैनिक, पंचायत समिती कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.