Tuesday, July 14, 2026

Latest Posts

26 व्या कबड्डी दिनानिमित्त सादर होणार सांस्कृतिक कार्यक्रम “गोष्ट वारीची


बुधवार दिनांक ,15 जुलै 2026 ,दुपारी 3 वाजता,

देसाई बँक्वेट हॉल,हॉटेल विवेक,रत्नागिरी.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित कबड्डी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी जन्मदिनानिमित्त 26 वा कबड्डी दिन सोहळा दिनांक 15 जुलै 2026 रोजी देसाई बँक्वेट, माळनाका येथे साजरा केला जाणार आहे.

त्या निमित्त दुपारी 3 वाजता वन म्युझिक हाऊस, मुंबई निर्मित “गोष्ट वारीची”  या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमातून वारीचा सुंदर सोहळा अभंग, कीर्तन, गोंधळ, जागरण आणि बतावणीच्या स्वरूपात गायन, नृत्य आणि वादानासहित याची देही याची डोळा रत्नागिरीकरांना अनुभवता येणार आहे.

रोहित सरनोबत आणि आदित्य कावले यांची निर्मिती असलेला हा सांस्कृतिक सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा कबड्डी व रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.