Saturday, February 14, 2026

Latest Posts

सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक; ३ जानेवारीला पदभार स्वीकारणार

मुंबई:  ३१ डिसेंबर २०२५ : ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक असलेले सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते येत्या ३ जानेवारी रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत.
सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना केंद्र सरकारकडून देण्यात आलेला वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था, प्रशासनातील सुधारणा आणि विविध महत्त्वाच्या पोलीस मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली.

सदानंद दाते हे १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी राज्य आणि केंद्र पातळीवर विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरही त्यांनी धैर्याने सेवेत पुनरागमन करत देशाच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. एनआयएचे प्रमुख म्हणून त्यांनी दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची आव्हाने, सायबर गुन्हेगारी, दहशतवादविरोधी उपाययोजना तसेच पोलीस दलातील आधुनिकरण या बाबींवर दाते यांच्या नेतृत्वाखाली भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

spot_img
spot_img

Latest Posts

spot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.